kokanmedia
Homeसाप्ताहिक कोकण मीडिया - २४ एप्रिल २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - २४ एप्रिल २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - २४ एप्रिल २०२०

साप्ताहिक कोकण मीडिया - २४ एप्रिल २०२०

 
₹0
Product Description

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या २४ एप्रिल २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/

२४ एप्रिल २०२०च्या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा : करोना - चीनच्या मासळी बाजारातून रत्नागिरीपर्यंत... ब्रिटनमधील रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे चार्टर्ड सायंटिस्ट असलेले डॉ. रोहन विजय आंबर्डेकर यांनी कोव्हिड-१९ या महामारीची शास्त्रीय माहिती देण्यासाठी लिहिलेला लेख. रत्नागिरीतील कुरतडे हे डॉ. आंबर्डेकर यांचे मूळ गाव आहे.

संपादकीय : पत्रकारांची सुरक्षा वाऱ्यावरच...

स्वातंत्र्य की स्वैराचार? लॉकडाउनचे उल्लंघन करण्याच्या घटनांबद्दल रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी लिहिलेला लेख...

समाजमाध्यमे व्यापून राहिले करोना वाङ्मय : राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा विशेष लेख..

करोना आणि मयग्याचे हाल! : बाबू घाडीगावकर यांची कथा

ललित लेख - आईचा श्याम - सौ. सुनेत्रा जोशी, रत्नागिरी मोठं शहर सोडायचं धाडस न होणाऱ्या सर्वांसाठी - सौ. शिल्पा करकरे, तुरळ

कोकणचे सुपुत्र असलेले वैभव मांगले लॉकडाउनच्या काळात आपल्या गावी चित्रकलेचा छंद जोपासत आहेत. त्याबद्दलचा वृत्तांत... त्याशिवाय, विविध विषयांवरचे वाचक विचार, कोकणातील उल्लेखनीय बातम्या, इत्यादी...

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now