kokanmedia
Home
साप्ताहिक कोकण मीडिया - ४ सप्टेंबर २०२०
Image
Other Image

साप्ताहिक कोकण मीडिया - ४ सप्टेंबर २०२०

 
₹0
Product Description

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या ४ सप्टेंबर २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/

या अंकात काय वाचाल?

संपादकीय : निर्ढावलेपणातून आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष http://kokanmedia.in/2020/09/04/skmeditorial4sep/

मुखपृष्ठकथा : एक (गाजर) स्वप्न : नवप्रवर्तनाचं : राज्यातला पहिला नवप्रवर्तन जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे. त्या निमित्ताने, कोकण विकासाच्या आतापर्यंतच्या घोषणा आणि नवी घोषणा यांचा वेध घेणारा, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख...

रिफायनरी प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्याची गरज : नवप्रवर्तन जिल्ह्याच्या घोषणेपेक्षा नाणार रिफायनरी प्रकल्प पुन्हा मार्गी लावला, तर अधिक फायदेशीर ठरेल, असे निवृत्त माहिती अधिकारी प्रभाकर कासेकर यांना वाटते. या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेला लेख...

अण्णा, शतायुषी व्हा! : कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक अण्णा शिरगावकर पाच सप्टेंबर २०२० रोजी ९१व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने, धीरज वाटेकर यांनी लिहिलेला लेख

एका म्हाळाची गोष्ट : बाबू घाडीगावकर यांचा मालवणी बोलीतील ललित लेख...

मी प्रणव मुखर्जी बोलतोय...

शाळेची फी भरू नका, दारू जरूर विकत घ्या : 'करोना डायरी'त किरण आचार्य यांचा लेख...

याशिवाय, 'वाचक विचार'मध्ये... रत्नागिरीतील रामनाथ हॉस्पिटलचा सकारात्मक अनुभव .... साप्ताहिक कोकण मीडियाच्या ताज्या अंकासह मागील अंक मोफत वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या. .... साप्ताहिक कोकण मीडिया व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक https://bit.ly/3gKp2PX

टेलिग्राम लिंक : https://t.me/kokanmedia

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now